शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

राजापूर:-शेजवली गावात आमदार किरण सामंत यांच्या सुचनेनुसार श्रमदानातून 4 ऑक्टोबर 2026 रोजी वनराई बंधारा बांधण्यात आला. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे शेतीचे, बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामूळे शेतकरी पूर्ण अडचणीत आले आहेत
शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
Villagers Build Vanrai Bandhara through Shramdan in Shejavli

पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याचे स्रोता मध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता आहे. विहिरीमध्ये पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने शेजवली गावचे सरपंच मंदार राणे यांनी पुढाकार घेऊन गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, विभाग संघटक महेश कारेकर, उपसरपंच दिलीप मेस्त्री, शाखाप्रमुख गोपीनाथ कदम, पदाधिकारी,

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: