ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करा,मेहनतीला पर्याय नाही–डॉ.प्रा.छोटू मावची

धडगाव:-विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे स्पष्ट ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न, मेहनत आणि चिकाटीने वाटचाल करावी.
ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करा,मेहनतीला पर्याय नाही–डॉ.प्रा.छोटू मावची
Set Goals and Strive Consistently

परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी आत्मविश्वास न गमावता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चितपणे मिळू शकते, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. प्रा. छोटू मावची यांनी केले.
महाराज ज.पो. वळवी कला व वाणिज्य व विष्णू कृष्ण कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयात धडगाव येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी डॉ.प्रा. अशोक राठोड आणि प्रा. अर्जुन पावरा  यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. प्रा. छोटू मावची यांनी वेंकेटेंश्वर युनिव्हर्सिटी तिरुपती पोस्ट डॉक्टरेट सुरु आहे. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनत यांचे महत्त्व समजावून सांगितले. जीवनात यश मिळविण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसून त्या स्वप्नाचे ध्येयात रूपांतर करून त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मेहनत करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. “ध्येय स्पष्ट असेल तर मार्ग सापडतो; प्रयत्न सातत्यपूर्ण असतील तर अडचणींवर मात करता येते आणि मेहनतीला योग्य दिशेची जोड मिळाली तर यश दूर राहत नाही,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रा. अशोक राठोड  यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेचा योग्य अंदाज घेऊन वास्तववादी ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी दररोज छोट्या- छोट्या उद्दिष्टांवर काम करावे, असे सांगितले. अपयश आले तरी निराश न होता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करणे हीच यशाची खरी वाट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. अर्जुन पावरा यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीला मर्यादा न मानता शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी
“माझे ध्येय काय?” याचा विचार करून त्यासाठी आवश्यक शिक्षण, कौशल्ये आणि मेहनतीचे नियोजन करावे. वेळेचा सदुपयोग, नियमित अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वास या गुणांच्या बळावर विद्यार्थ्यांना आपल्या भवितव्याला योग्य दिशा देता येईल, असा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गायकवाड प्रभारी प्राचार्य डॉ.प्रा.राजू पवार यांच्या मार्गदर्शनाला मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये ध्येय निश्चिती आणि भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा निर्माण झाली.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: