अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त

(नंदुरबार) अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहर हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाची वाहतूक करणारे आयशर वाहन पकडून कारवाई केली असून एकूण अंदाजित 69 लाख 47 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त
fda-raid-seizes-goods-worth-69-lakh-47-thousand
        अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सपना गोडसे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दि. 8 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 2.45 वाजता करण चौफुली ते जकातफाटी रस्त्यावर, करण चौफुलीजवळ धुळेकडे जाणारे वाहन क्रमांक MH-48-DQ-6062 अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व वी-1 तंबाखू आढळून आले.
        तपासणीत आढळून आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थांची अंदाजे किंमत 39 लाख 47 हजार 150 रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या आयशर वाहनाची अंदाजे किंमत 30 लाख रुपये आहे.असे एकूण अंदाजित 69 लाख 47 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र रोहित डौले,संकेत आबा सदाफुळे यांच्या पथकाने केली. कारवाई आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने व सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
       या प्रकरणी वाहनचालक मोहम्मद हलीम व इतर संबंधितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री यावर सातत्याने विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: