
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव तालुक्यातील बोधला पाडा, चार्ली चा पाडा व तीनसमाळ या गावांना नुकतीच भेट दिली.
यावेळी हरित रोजगार व जल सुरक्षित गाव या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी जलसंवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधत समाधान व्यक्त केले.
धडगाव तालुक्यातील सुमारे 100 पाड्यांवर जलसंवर्धनाचे काम राबवले जाणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला!
या भेटीप्रसंगी जल जीवन मिशनचे कार्यकारी अभियंता अजय पाटील, गटविकास अधिकारी मनोज भोसले, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया, डॉ. सुमंत पांडे, श्री. अजित गोखले, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
धडगाव तालुक्यातील जलसंवर्धनाची ही वाटचाल प्रेरणादायी ठरणार आहे!

#JalSamvardhan#GreenEmployment#DhuleDistrict#MitaliSethi#Nandurbar#HydrationMission#SustainableVillage