
राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२२ व २०२३ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२३ व २०२४ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.