नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे २५,००० विद्यार्थ्यांचे विविध शाळांमध्ये हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. यापैकी १९,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या प्रवेशोत्सव उपक्रमात मान्यवर आमदार, अधिकारी, लोकप्रतिनिधी, शाळा व शिक्षण विभाग प्रमुखांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत केले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी – जि.प. शाळा, सुंदरदे
मा. आमदार डॉ. विजयकुमार गावीत – नटावद व देवपूर
मा. आमदार राजेश पाडवी – दलेलपूर
मा. आमदार शिरीष नाईक – नवागाव व बोरवण
मा. आमदार आमशा पाडवी – अंकुशविहीर
मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार – गुजरभवाली
प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी – दुधाळे व ठाणेपाडा
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व मोजे यांचे वाटप करण्यात आले.
पालक व शिक्षक यांच्यातही आनंद व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

#SchoolChaleHum#ShalaPraveshotsav2025
#ZPNandurbar#NandurbarEducation#शाळा_प्रवेश_सोहळा
#MissionEducation#WelcomeStudents#TransformingEducation#शिक्षण_हक्क
#नंदुरबार_शिक्षण#HappyStudents#LearningBegins#BackToSchool2025
















