वर्धा : सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी आर्वी व कारंजा ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच रुग्णालयातील विविध कामांचा आढावा घेतला. भेटी दरम्यान वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुमंत वाघ यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहाराविषयी विचारणा करुन रुग्णांना चांगल्या प्रकारचा आहार पुरविण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या सिकलसेल मोहिमेसंदर्भात कामांचा आढावा घेऊन रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यात याव्या. रुग्णालयातील औषधी पुरवठ्याकडे विशेष लक्ष देऊन रुग्णांना नियमित वेळोवेळी ओषध पुरवठा झालाच पाहिजे, अशा सूचना केल्या. जिल्ह्यात दर बुधवारी नव्याने सुरु करण्यात आलेल्या रजोनिवृत्ती क्लिनीक ओपीडी संदर्भात करावयाच्या कारवाई संबंधित सूचना करण्यात आल्या.
















