Home महाराष्ट्र राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था

राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था

11
A total of 97 government institutions in the state have been upgraded under the state's 150-day e-governance reform program.

मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत २०० गुणांपैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ व विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.

राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासन, कालबद्ध सेवा, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.

#महाराष्ट्रसागरीमंडळ