Home महाराष्ट्र जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रम उत्साहात...

जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
Special program for women concluded with enthusiasm at Krishi Vigyan Kendra, Kolda on the occasion of International Women's Day

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरण, आरोग्य आणि कायदेविषयक जागरूकतेवर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य डॉ. राजेंद्र दहातोंडे होते. यावेळी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरचे प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. सीमा खत्री तसेच जिल्हा रुग्णालयाचे वैज्ञानिक अधिकारी श्री. मधुसूदन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आरती देशमुख यांनी करत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली व डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्या योगदानावर प्रकाश टाकला.

यावेळी ॲड. सीमा खत्री यांनी महिलांच्या कायदेविषयक हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन करत विविध संरक्षणात्मक कायद्यांची माहिती दिली. श्री. मधुसूदन वाघमारे यांनी महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.

डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शामकांत पाटील यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात जनजागृती करत महिलांचे सामाजिक व कृषी क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. तसेच श्री. तेजल माळी, समुपदेशक, जिल्हा रुग्णालय यांनी एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग तसेच हेपेटायटिस बी व सी या आजारांविषयी माहिती देत प्रतिबंध व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. गोपाल गाडीलोहार यांनी संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या विविध सेवांची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र दहातोंडे यांनी जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची उदाहरणे देत उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमादरम्यान महिलांची शुगर, ब्लड प्रेशर, एचआयव्ही व सिफिलीस यांसारख्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्या श्री. साजिद अन्सारी, कुमारी नीलम पाडवी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. संतोष मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरचे जितेंद्र सोनवणे, प्रकाश सोनवणे, दक्षा वसावे, चेतना मांडलिक, कमल खर्डे, मोनिका मोरे, निलेश साबळे, आशुतोष बाभरे, ज्योती देसाई, सविता जगताप आणि जोता पावरा यांनी विशेष परिश्रम घेतले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आरोग्य जागरूकतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

#internationalwomensday#kvk#collectorofficenandurbar