
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी भाषांच्या जतन व संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रकल्प अस्तित्व – Tribal Language AI’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या योगदानकर्त्यांचा गौरव समारंभ दिनांक २५ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आदिवासी भाषांचे जतन करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. विशेषतः देहावली (भिली) या भाषेच्या डिजिटलायझेशनसाठी सामूहिक प्रयत्नांतून अल्प कालावधीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
महाविस्तार प्लॅटफॉर्मवर देहावली भाषा:
या प्रकल्पाची पहिली युज केस म्हणून Mahavistar AI प्लॅटफॉर्मवर देहावली भिली भाषेचा यशस्वी समावेश करण्यात आला. हा टप्पा केवळ तांत्रिक यश नसून, आदिवासी भाषांना डिजिटल युगात स्थान मिळवून देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरला आहे.
योगदानकर्त्यांचा सन्मान:
या यशामागे कार्यरत असलेल्या सर्व योगदानकर्त्यांचा मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास मा. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत पवार तसेच इतर अधिकारी वर्गाची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी सूत्रसंचालन निती फेलो क्षितिजा देशमुख यांनी केले.
‘प्रकल्प अस्तित्व’ हा केवळ भाषेचा प्रकल्प नसून, आदिवासी ओळख, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा जतन करण्याचा व्यापक प्रयत्न आहे. या माध्यमातून आदिवासी भाषांना डिजिटल स्वरूपात जतन करून पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
ही केवळ सुरुवात असून, या प्रवासाला अधिक व्यापक करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
#ProjectAstitva#TribalLanguageAI#TribalDevelopment#LanguagePreservation#AIForGood#collectorofficenandurbar















