Home नंदुरबार जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून आढावा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून आढावा

0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून आढावा
Minister Shivendrasinh Bhosale reviews various works of Public Works

मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हॅमअंतर्गतची कामे, विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी कामे, महामार्गावरील जनसुविधा केंद्रे यासह विविध विषयांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

मंत्री भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मंत्रालयातील दालनात घेतली. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, सचिव (रस्ते) राजभोज यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.मंत्री भोसले म्हणाले की, स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा, त्यांच्या शेतमालाला ग्राहक मिळावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी बाजार सारखा उपक्रम राबविता येईल. यातून स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहक उपलब्ध होईल व त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. राज्यातील काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात यावे, असे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करावा. विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे, रस्त्यांचा दर्जा, देयके, महामार्गावरील खड्डे आदी विविध बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे ही दर्जेदार व्हावीत, याकडे लक्ष द्यावे. तसेच विभागाच्या क्षेत्रीय स्तरावर नियमित बैठका घेऊन विविध कामांचा आढावा घेण्यात यावा, असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here