(अलिबाग) इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर सुरु असून यासाठी शासकीय यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील आहे. अद्यापही शोध न लागलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. Khalapur Landslide Update
अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! Khalapur Landslide Update
नैसर्गिक आपत्ती होते तेव्हा त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. हवामानासबंधी नैसर्गिक आपत्तींमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वन्य अग्नी, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि शीतलहरी यांचा समावेश आहे, नैसर्गिक आपत्ती या अनिश्चित असतात. नैसर्गिक आपत्तीत धोकादायक घटना घडतात की, ज्यात मालमत्ता व वस्तूंचे नुकसान तसेच जीवितहानी व मनुष्यहानी होऊन जनजीवन विस्कळीत होते.
कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगररांगांमुळे कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होते. त्यामुळे कोकणाला मोठया प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना ही करावा लागतो. कोकण विभागात एकूण 7 जिल्हे असून 50 तालुके आणि 6 हजार 353 गावे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे सरासरी 2 हजार ते 3 हजार 368 मि.मी. पाऊस हा कोकणात पडतो. विशेषत: मुंबई व ठाणे जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस आणि भरतीची वेळ एकच असल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोकण विभागात गेल्या सहा वर्षात सरासरी 2 हजार 701.40 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 371 पूरप्रवण व 223 दरडग्रस्त गावे आहेत.
कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3 हजार 200 कोटी रुपये विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळात आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. राज्यभरातील 20 पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये एकूण 7 हजार 900 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
![Khalapur Landslide Update](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Khalapur-Landslide-Update-4-1024x576.png)
शांत निजलेल्या इशाळवाडीत अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले (Khalapur Landslide Update)
असे असताना दरडप्रवण क्षेत्रात न मोडणाऱ्या रायगड जिल्हयातील इशाळगड येथे परवा दि.19 जुलै 2023 रोजी रात्रीच्या वेळी इशाळगडाच्या पोटात वसलेल्या आणि कलावंतीण दुर्गाच्या शेजारी असलेल्या प्रसिध्द ट्रेकर्स पॉईंट असलेल्या इशाळवाडीवर बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. शांत निजलेल्या इशाळवाडीत अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि सारा महाराष्ट्र हादरुन गेला. रायगड जिल्हयातील माथेरान आणि आसपासच्या परिसरात गेल्या तीन- चार दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. त्या मुसळधार पावसामुळे इशाळवाडीतील 48 पैकी 17 घरे गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास वीस घरांचे गंभीर नुकसान झाल असून उर्वरीत दहा घरे वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक अवघ्या तासभरातच घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदारात वाऱ्यामुळे बचाव पथकांची निसर्गाने जणू परीक्षच घेतली. पाऊसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यत पोहचण्यास बचाव पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी घटनास्थळी तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरु करण्यास अडचणी उद्भवल्या. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी असल्याने मदतीसाठी कोणतेही यांत्रिकी साधने आणणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त माणसाच्या मदतीने येथे मदत पोहाचविणे शक्य होते.
![Khalapur Landslide Update](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Khalapur-Landslide-Update-2-1024x576.png)
रेनकोट घातलेले ‘कार्यकर्ते मुख्यमंत्री’ (Khalapur Landslide Update)
एनडीआरएफ , एसडीआरएफ, टिडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रत्यक्ष मदतकार्यास सुरुवात झाली. या शिवाय ट्रकेर्स ग्रुप, स्वंयसेवी संस्था, देखील मदतीसाठी सरसावल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड ते दोन तास पायी दगडधोंडयाचा निसरडा चिखलमय निसरडा रस्ता तुडवत प्रसंगी प्रतिकुल परिस्थितीत मुख्यमंत्री श्री. शिंदे इशाळगडावर पोहचले. वाटेत दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांशी आस्थेवाईकपणे चौकशी करत जणू त्यांचे दु:खअश्रू पुसण्याचे काम ते करत होते. एवढयावर न थांबता वेळप्रसंगी हवाई मदतीसाठी सूचना देत अन्न, पाणी, निवाराची सोय आहे की नाही याची जातीणं पाहणी करत होते.
या त्यांच्या तत्परतेमुळे अनेक जाणते अजाणते हातामध्ये हत्तीच बळ संचारले होते. यात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन वहाने तातडीने रवाना करण्यात आल्या. तात्पुरते राहण्यासाठी सोय व्हावी यासाठी आठ कंटेनर देखील पाठविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून रायगड जिल्याहयातील उद्योग व संस्था देखील पुढे आल्या आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य, घटनास्थळाकडे पाठविण्यात येत होते. यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेस कॅम्पकडे 20 X 10 आकाराचे चार कंटेनर पाठविण्यात येत आहेत. 40 X 10चे दोन कंटेनर पाठविण्यात आल्या आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी , रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्ल्यू समूह येथून रवाना झाले आहे. घटनास्थळ उंचावर असल्याने मशिनरी साहित्य पोहोचत नसल्याने दरड कोसळून निर्माण झालेले मातीचे ढिगाऱ्या करण्यासाठी दूर करण्यासाठी पनवेल येथून एैशी अनुभवी कारागिराचे पथक औजारासह दाखल झाले आहेत. येथील विद्युतपुरवठा सुरळीत सुरु होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता , महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहेत.
या सह यंत्रणेसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याचे पाण्याची व्यवस्था या दुष्टीने महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदाचे पाणीपुरवठा अभियंता व त्यांची यंत्रणाकाम करत आहेत. तेथे साहित्यसामुग्री व अतिमहत्वाच्या व्यक्तींचा समन्वय , हॅलीपॅड आदि सुविधा तयार केले जात आहेत. जिल्हा शलयचिकित्सक अलिबाग यांच्याकडून जखमीवर उपचार केले जातात. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदतकार्यवर लक्ष्य ठेवून आहेत. स्वत: विभागीय आयुक्त डॉ.कल्याणकर, जिल्हाधिकारी श्री.म्हसे दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर तातडीने रात्री दीड वाजता घटनास्थळी प्रत्यक्ष पोहचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नराळे यांनी खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत बचाव कार्यासाठी आवश्यक साधन सामुग्री, मनुष्यबळ उपाययोजनांची तयारी केली. महसूल, जिल्हापरिषद व पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचारीसह नागरी संरक्षणदल मुंबई येथून दोन पथके, एनडीआरएफची चार पथके दीडशे मनुष्यबळासह घटनास्थळी पोहचले आहेत. याच बरोबर इतर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी, ट्रेकर्स, मंडळे जवळपास सातशे जण मदतकार्यास पोहचले आहेत. नवीमुंबई महानगरपालिका अग्निशामकदलाचे पथकात 44 अधिकारी कर्मचारी दोन जेसीबीसह काम करत आहेत. सहाय्यक अग्निशमन केंद्राअधिकारी शिवराम ढुमणे यांचा हदयविकाराने मृत्यू झाला. एरव्ही शासकीय अधिकारी कर्मचारी कायम टिकेचे धनी होत असतात. भले काम करत असतांन वेळ प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. ही नित्याची बाब झाली आहे. परंतू त्यांच्या कामाची साधी दखल कुठे घेतली जात नाही. हे अतिशय दुदैवी बाब आहे.
आजही भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक 198 मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली. यावेळी कोकण विभागाच्या सरासरी 136.7 मि.मी. पाऊस झाला आहे. अशावेळी दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदत साहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पा़ड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकीय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे. या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले आहे. या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.
![Khalapur Landslide Update](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Khalapur-Landslide-Update-3-1024x576.png)
एकूणच काय तर जेव्हा एखादी आपत्ती उद्भवते तेव्हा त्या घटनेमागे अनेक कारणे असतात. परंतू दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी अनेक जाणते अजाणते हात तेथे सिंहाचा वाटा उचलत असतात. हे काम करत असतांना मदतकर्त्याना अनेक संकटाना तोंड देत अहोरात्र मदतीचा ओघ सुरु असतो.
या गावातील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंत जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. तसेच इरशाळवाडीसाठी एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून अद्यापही शोध न लागलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.
किती बळी गेले? बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी समिती (Khalapur Landslide Update Live)
इरशाळवाडीच्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. या गावांतील 43 कुटुंबातील 229 लोकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून अद्यापही 86 नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे. सदर घटनेमध्ये आपले नातेवाईक गमावल्याने स्थानिक नागरिकांवरती मोठा मानसिक आघात झाला आहे, त्यामुळे नातेवाईकांमध्ये भिंतीचे वातावरण काही नागरीक समोर आलेले नाहीत. तरी इरसाळवाडी गावांतील नागरिकांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यांत आली असून जिल्ह्यातील इतर नागरिकांनी व त्यांचे नातेवाईकांनी इरसाळवाडी येथील नागरिकांची काही माहिती असल्यास दूरध्वनीव्दारे संपर्क साधावा अथवा पोलीस स्टेशन चौक, ता. खालापूर प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी यावेळी केले. संपर्कासाठी श्री. दिक्षांत देशपांडे तहसिलदार माथेरान मो.नं. 8669056492, श्रीमती शितल राऊत, पोलीस अधिकारी मो.क्र.9850756595, श्री.सतिश शेरमकर, सहा.प्रकल्प अधिकारी मो. क्र.9403060273.
![Khalapur Landslide Update](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Khalapur-Landslide-1-1024x576.png)
या गावातील नागरिकांचे जुने मुंबई-पुणे महामार्गावरील चौक गावानजिक असलेल्या शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन करण्यात येत असून त्यासाठी 32 कंटेनर सज्ज करण्यात आले आहेत. याठिकाणी 20 शौचालये, 20 बाथरुम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गृहोपयोगी सर्व साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किटस तयार ठेवण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यात आली असल्याचे डॉ. म्हसे यांनी यावेळी सांगितले. या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य वेगाने सुरु असून एनडीआरएफचे 4 ग्रुप असून 100 जवान, टीडीआरएफचे ८२
कामगार, इमॅजिकाचे 82 कामगार, सिडकोचे 460 कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास 1 हजार लोक काम करीत आहेत. तेथील नागरिकांना साथीच्या रोगाचा त्रास होवून यासाठी गडाच्या पायथ्याला छोटा दवाखाना उभा करण्यात आला असून इरसाळवाडी गावासाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जंतूनाशक फवारणीही करण्यात येत आहे. https://nandurbarnews.in/khalapur-landslide/
धोकादायक गावांसाठी पालक अधिकाऱ्यांची नेमणूक
रायगड जिल्हा आपत्ती प्रवण जिल्हा असून जिल्ह्यातील एकूण 103 गावे धोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. यामध्ये 9 गावे अतिधोकादायक तर 11 गावे धोकादायक मध्ये आहेत. तर 83 गावे अल्पधोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. यागावांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भेटी देवून तेथील सद्य:स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर धोकादायक असलेल्या 20 गावातील नागरिकांना निवाराशेड मध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित 83 कमी धोका असलेल्या गावांची पाहणी करुन त्यांच्यास्तरावर निर्णय घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना या गावासाठी पालक अधिकारी नेमणूक करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. भविष्यात देखील हवामान खात्याकडून आँरेज आणि रेड अलर्ट देण्यात येतील त्याकाळात अतिधोकादायक गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात यावे,. तसेच त्यांना जीवनावश्यक सर्व सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त या 20 गावांमध्ये सायरन, सिंग्नल, यंत्रणा तयार करण्यात यावी. याबरोबरच गावामध्ये सुरक्षित असे एकत्रित येण्याची ठिकाण निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे डॉ.म्हसे यांनी सांगितले.
![Khalapur Landslide Update](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/07/Khalapur-Landslide-2-1024x576.png)
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश
रायगड जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्या आठवड्याच्या आत प्राधान्याने भरण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. अलिबाग-वडखळ रस्त्यावरील तसेच महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
आर्थिक मदतीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
या दुर्घटनेतील नागरिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर
व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व पिण्याचे पाणी आणि सुका खाऊ या साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा. ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी कळविले आहे.