Home नंदुरबार जिल्हा देहली धरण १०० टक्के भरले : नदी काठ व धरण क्षेत्रातील नागरिकांनो...

देहली धरण १०० टक्के भरले : नदी काठ व धरण क्षेत्रातील नागरिकांनो सावधान !

21

(अक्कलकुवा) देहली प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणी साठा झाला आहे.पुढील काही तासात या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन केव्हाही पाण्याचा विसर्ग चालु होऊ शकतो. त्यामुळे देहली प्रकल्प व नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.(Dehali Dam Akkalkuwa Overflow,Alert for Riverside Residents)

नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकांत असलेल्या देहली मध्यम प्रकल्पाच्या (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठावरील व कालवा क्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता तु.प्र.चिनावलकर यांनी दिल्या आहेत.

देहली प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणी साठा (Dehali Dam Akkalkuwa Overflow,Nandurbar News)

सद्यस्थितीत देहली प्रकल्पात पाणी पातळीत १९७.७० मी. ची नोंद झाली असून प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणी साठा झाला आहे. पुढील काही तासात या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन केव्हाही पाण्याचा विसर्ग चालु होऊ शकतो. त्यामुळे देहली प्रकल्प व नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याचे तु.प्र.चिनावलकर यांनी कळवले आहे.

देहली नदीच्या डाव्या व उजव्या काठावरील तसेच कालव्यावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुर-ढोरे सोडू येऊ नयेत. कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात स्वत: जावू नये, याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही आवाहन तु.प्र.चिनावलकर यांनी केले आहे.

ही आहेत देहली नदी काठावरील गावे (Dehali Dam Akkalkuwa Overflow,Nandurbar News)

उजवा नदी काठ :– रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई

डावा नदी काठ : रायसिंगपुर, पुर्नवसन आंबाबारी, जुना नागरमुथा, नवा नागरमुथा, मध्यम नागरमुथा, घोटपाडा, कोराई,खापर

उजवा नदी काठ : रांझणी, घुसी, लालपुरा, वल्ली, कोराई

कालवा क्षेत्रातील गावे:उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा,पोहरा, गंगापुर, घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर, कंकाळी

मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवनावर परिणाम (Dehali Dam Akkalkuwa Overflow)

अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन जनजीवनावर परिणाम झाला आहे. पूराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून ४० वर्षानंतर पूर्ण झालेल्या देहली मध्यम प्रकल्पात पहिल्याच पुराच्या पाण्यात जलमय स्थिती पाहायला मिळाली आहे.

अनेक शेतांमध्ये व पुनर्वसंन न झालेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने घरगुती सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी आणि छोटे नाले भरून शेतांमध्ये जलमय परिस्थिती झाली असून वस्तींमध्ये पाणी शिरले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या या गावातील नागरिकांना प्रशासनाने जलमय परिस्थितीचा आढावा घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.