Home नंदुरबार जिल्हा दुर्गम भागातील पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करा : डॉ. विजयकुमार गावित

दुर्गम भागातील पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करा : डॉ. विजयकुमार गावित

12
Flood & Heavy Rainfall
Flood & Heavy Rainfall

(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्याचे बहुतांश क्षेत्र हे डोंगरी व दुर्गम असून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आरोग्य,दळणवळणासह दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व विभागांनी पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करावे. तसेच अत्यावश्यक सेवांसह सर्व विभागांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत. (Be ready to handle Monsoon disaster says dr vijaykumar gavit)

ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘दिशा’ समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.हिना गावित होत्या. जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, पदाधिकारी व विविध यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

flood and heavy rainfall

खत टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी (Be ready to handle Monsoon disaster)

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, खतांचा पुरवठा, गरज यांचा वेळोवेळी आढावा घेवून कुठेही खत टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी.धरणांमधील पाणी साठा व विसर्गाचे नियोजन करून नदी व धरण काठावरील गावे, नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात. कुठेही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. पूलांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावित. रूग्णवाहिका सुस्थितीत ठेवण्यासह वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविक,शिक्षक तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबवे. जलजीवन मिशनच्या लाभापासून एकही पाडा आणि गाव वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. जलयुक्त शिवाराची कामे करताना ग्रामसभा घ्याव्यात असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

flood and heavy rainfall

केंद्र सरकारच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी (Be ready to handle Monsoon disaster)

केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा सर्व्हे करताना एकही गाव, नागरिक सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या सूचना देताना कुठल्याही योजनेचा लाभ देताना स्थानिक ग्रामसभा व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही आदर करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिल्या आहेत.

अतिपाऊस, वादळ यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीत बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयारी ठेवली असून पावसाळ्यापूर्वीच पूर, वादळ, आग, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीवर मात करुन जीवित व वित्त हानी कशी टाळता येईल, याबाबत प्रशिक्षण देण्यात येवून प्रात्यक्षिकाद्वारे रंगीत तालीम घेण्यात आली. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी आपत्तीतील विविध प्रकारची होणारी हानी कमी करण्यासाठी नागरिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे. 

flood and heavy rainfall

पूरपरिस्थितीत घ्यावयाची काळजी (Precautions during flood situation)

  • सुरक्षित ठिकाणी राहून अचूक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा.
  • सरकारी सुचनांचे पालन करुन सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हा.
  • विद्युतप्रवाह बंद करा व उघड्या तारांना स्पर्श करु नका.
  • पोहता येत असल्यास बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा.
  • अपरिचित किंवा खोल पाण्यात जाऊ नका.
  • पुरानंतरही नदीच्या पात्रात जाऊ नका. क्लोरीनयुक्त पाणी प्या.
  • उकळलेले पाणी प्या आणि सुरक्षित अन्नसेवन करा.
  • साठवलेल्या पाण्यात, डबक्यात किटकनाशके शिंपडा.
  • आपत्ती सर्व्हेक्षण गटाला अचूक माहिती पूरवून सहकार्य करा.
  • आपत्ती साधनसामुग्रीचे योग्य पद्धतीने, पद्धतशीरपणे वितरण करा. त्यासाठी स्थानिक मंडळ आणि स्वयंसेवक तयार करा.
  • धोकादायक आणि मोडकळलेल्या घरात प्रवेश करुन नका.

तुफान/वादळापूर्वी घ्यावयाची काळजी (Precautions before Storm)

  • रेडीओ (आकाशवाणीने), दूरदर्शनवरील बातम्या उद्घोषणा ऐकत चला.
  • मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश करण्याचे साहस करु नये, आपले जहाज सुरक्षित ठिकाणी नांगरा.
  • मिठागरे तयार करणाऱ्या मजुरांनी सुरक्षितस्थानी स्थलांतर करा.
  • तुमच्या घराची दारे, खिडक्या मजबूत करा. गरजेच्या असणाऱ्या बॅटऱ्या, कंदील, खाद्यपदार्थ, पाणी, कपडे, आकाशवाणी इत्यादी वस्तू ताबडतोब वापरण्यासाठी तयार ठेवा.
  • मौल्यवान वस्तू प्लॅस्टिक पिशवीमध्ये बंद करा आणि त्यांना घरच्या वरच्या बाजूवर (माखणीवर) वगैरे ठेवा. आपली वाहने सुसज्ज ठेवा.
  • गरज भासल्यास आणखी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हा आणि प्राण्यांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा.

वादळ, तुफान असल्यास (Precautions during Storm and heavy rainfall)

  • पाण्याच्या प्रवाहापासून दूर जा.
  • वृक्षांजवळ किंवा विजेच्या खांबांजवळ थांबू नका, वीज प्रवाह आणि गॅस प्रवाह बंद करा.
  • घरातून बाहेर पडू नका, घराची दारे आणि खिडक्या बंद करा.
  • नियंत्रण कक्षाकडून दूरध्वनीद्वारे अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, अफवांपासून दूर रहा.

तुफान, वादळानंतर (Precautions after Storm and heavy rainfall)

  • उद्घोषणेनंतरच बाहेर पडा.
  • अपरिचित जलप्रवाहातून ये-जा करु नका.
  • प्रथमोपचारानंतर जखमींना दवाखान्यात न्या, नंतर लगेचच अडकलेल्यांना वाचवा.
  • विद्युतप्रवाह जिच्यातून वाहत आहे किंवा जी तार तुटलेली आहे/उघडी पडलेली आहे तिला स्पर्श करु नका.
  • पडक्या इमारती जमीन दोस्त करा.
  • पिण्यासाठी क्लोरीनयुक्त पाणी वापरा, साठवलेल्या आणि घाण पाण्यात निर्जंतूक शिंपडा.

आपत्ती काळात वरील उपाययोजनांचा अवलंब केला तर होणारी जीवित व वित्त हानी आपणास काही प्रमाणात निश्चितच टाळता येईल.