“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्या महिलांनी जिल्ह्यांच्या महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याच्या संदर्भातील बातम्या काही वृत्तवाहिन्या व सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. याबाबत महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी स्पष्टीकरण दिले असून अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय घेण्यात आलेला नाही.
ZEE 24 तास व इतर माध्यमांमध्ये “लाडक्या बहिणींना अखेरची संधी” या मथळ्याखाली प्रसारित करण्यात आलेली बातमी अप्रमाणित (Unverified) असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांनी जिल्हा महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करावीत, अशा प्रकारचे कोणतेही निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत.
महिला व बाल विकास विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीची खातरजमा करूनच त्यावर विश्वास ठेवावा.
चुकीची माहिती प्रसारित करून महिलांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
– महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन
#लाडकीबहीण#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण#महत्वाचीसूचना#FakeNewsAlert#OfficialUpdate#WomenEmpowerment#MaharashtraGovernment#Nandurbar#StayAware#FactCheck#SocialMediaAwareness#महिलावबालविकासविभाग#GovernmentUpdate#BewareOfRumors#DigitalAwareness
















