टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम ) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आणि आयडीएफसी बँक, मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘मुंबई टेक वीक २०२६’ होईल. ‘इंडिया : आय इन ॲक्शन’ या थीमअंतर्गत विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार आहे. मेटा, एंथ्रॉपिक, ओपन एआय, गुगल क्लाऊड आणि नेसा यांसारख्या कंपन्या यामध्ये सहभागी होतील. यावेळी मुंबई टेक वीक लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. एमटीडब्ल्यू सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासन एआय क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी नेहमी पुढाकार घेईल. गत वर्षीपेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी ‘मुंबई टेक वीक’ आयोजित करूया आणि महाराष्ट्रातील युवकांना एआय क्षेत्रातील नव्या संधींशी जोडूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण) कौस्तुभ धवसे, ‘टीम’चे आकृत वैश, हर्ष जैन, नैव्या साग्गी आदी उपस्थित होते.
















