Home आरोग्य जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड;25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड;25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

1
Selection of non-official members for the District Institution Inspection Committee; call to submit proposals by June 25.

(नंदुरबार)बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2025 च्या कलम 54 नुसार महिला व बाल विकास विभागांतर्गत नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हा स्तरावर ‘तपासणी समिती’ गठित करण्यात येणार आहे. या समितीवर काम करण्यासाठी पात्र अशासकीय सदस्यांकडून 25 जून 2026 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

या जिल्हास्तरीय संस्था तपासणी समितीमध्ये प्रामुख्याने दोन अशासकीय सदस्यांची निवड करावयाची आहे. यामध्ये: बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समूहाचा एक सदस्य. व बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ज्ञ सदस्य.

सदस्यांसाठी आवश्यक पात्रता व अटी:

• शैक्षणिक पात्रता व अनुभव: अर्जदार अशासकीय सदस्य किमान पदवीधर असणे आवश्यक असून, त्यांना बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

• वयोमर्यादा: सदस्याचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

• कार्यकाळ: निवड झालेल्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ नेमणुकीच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांचा राहील.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह, स्वतःच्या वैयक्तिक माहितीचा तपशील (बायोडाटा) व फोटोसह आपले प्रस्ताव दिनांक 25 जून 2026 पर्यंत कार्यालयात सादर करावे. अधिक माहिती आणि संपर्कासाठी उमेदवारांनी ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 226, टोकर तलाव रोड, नंदुरबार ‘ येथे किंवा 02564-210047 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.