नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण व आरोग्यविषयक उच्च जोखीम असलेल्या गावांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव तालुक्यातील माळ गावाला भेट देऊन ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य व महिला-बालविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.
माता-बाल आरोग्य,
कुपोषण निर्मूलन,
शिक्षण,
स्वच्छता,
जनसहभाग आणि वर्तनात्मक बदल
या महत्त्वाच्या विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी थेट दत्तक घेतलेल्या माळ, गेंदा, खर्डी खुर्द, खुटवाडा आणि तिनासमाळ या पाच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी दरमहा प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. गावागावांत आरोग्यदायी सवयी, पोषणाविषयी जागरूकता आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ पोहोचवून कुपोषण निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी धडगावचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा, एएनएम तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दुर्गम भागातील माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, कुपोषणमुक्त समाज घडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाची गती वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. लोकसहभाग, प्रशासनाची बांधिलकी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या बळावर निरोगी व सक्षम गावांचा मार्ग अधिक मजबूत होणार आहे.
#Nandurbar#DrMittaliSethi#PoshanMuktNandurbar#HealthyVillage#MalVillage#Dhadgaon#TribalDevelopment#MaternalHealth#ChildHealth#NutritionMission#PublicHealth#JanBhagidari#ViksitNandurbar#WomenAndChildDevelopment#NandurbarNews
















