(नंदुरबार) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी, जमीन मालकांनी 21 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांनी अर्ज सादर करावेत (Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhiman Yojana)
अनुसूचित जातीच्या दारिद्र्य ररेषेखालील भूमिहिन कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) देण्याची ही योजना सामाजिक न्याय विभागातर्फे 100 टक्के अनुदानित राबविण्यात येते.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाला 4 एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल 8 लाख प्रती एकर जमीन उपलब्ध करुन देण्यात येते.
अपेक्षित कागदपत्रे (Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhiman Yojana)
जमीन विक्री करणाऱ्या अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र व 7/12 उतारा. संबंधित परिसरातील कृषी पतपुरवठा सेवा सोसायटी, व बँकचे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र. शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचा टाचन व नकाशा, शेतजमीन खरेदी करणे बंधनकारक असणार नाही याबाबत घोषणापत्र, नुकसान भरभाई मागणार नसल्याबाबत, न्यायालयीन वाद सुरु नसल्याबाबत, जमीन गहाण नसल्याबाबत जमीन विक्री करणाऱ्या मालकाचे शपथपत्र, कुंटूंबातील दोन व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या व त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आदि आवश्यक कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. वसावे यांनी कळविले आहे.