
मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता समिती डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावरील विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा तसेच इतर अनुषंगिक विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेताना कामांमध्ये गुणवत्ता, गती आणि वेळेत पूर्णत्व यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंते, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंते, उपअभियंते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यांसाठी प्रस्तावित प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले.
#नंदुरबार#डॉ_मित्ताली_सेठी#जलजीवनमिशन#जिल्हापाणीवस्वच्छतासमिती#महाराष्ट्रजीवनप्राधिकरण#जिल्हापरिषद#पाणीपुरवठा#अक्कलकुवा#अक्राणी#विकसितनंदुरबार















