Home देश-विदेश अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे

अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे

2
Under the Amrut Bharat Station Scheme, 75 state-of-the-art Amrut railway stations in the country will be built.

रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचे सांगितले. देशातील आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित होत आहेत, ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान स्मरणात ठेवून विकासाचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळत असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचेच उदाहरण असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.

पुणे विभागीय रेल्वे मंडळाकडून बारामती येथील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील यशस्वी विध्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे उपस्थित होते.