Home टेक न्युज आषाढीवारी२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पांडुरंगाचा वारकरी समाधानी होईल अशा पद्धतीच्या सुविधा

आषाढीवारी२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पांडुरंगाचा वारकरी समाधानी होईल अशा पद्धतीच्या सुविधा

0
In preparation for the Ashadhi Wari 2026, the administrative machinery is arranging facilities designed to ensure the satisfaction of Lord Pandurang's *Warkaris* (pilgrims).

वारी, सुरक्षित आणि निर्मळ’ ठरेल यासाठी सर्व शासकीय विभागानी सक्रिय सहभाग घेऊन सांघिक कामाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करून वारी यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी अनुषंगाने आढावा बैठकीत केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. दर्शन रांग, वाळवंट, भक्ती सागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छता आणखी नियमितपणे होणे आवश्यक असून, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवावी. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी आपण दिलेल्या सोयी सुविधामुळे तसेच स्वच्छतेमुळे येथून समाधानी होऊन गेला पाहिजे या दृष्टीने यंत्रणेने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजेंद्र खरे, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#महाराष्ट्रशासन#वारी#pandharpurwari2026#pandharpurdiaries