Home नंदुरबार जिल्हा स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण

स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत वृक्षारोपण

1
Tree plantation drive as part of 'Janseva Saptah' (Public Service Week) on the occasion of the birth anniversary of the late Ajit Pawar.

नंदुरबार(प्रतिनिधी):-स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ती मालती वळवी यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी एक झाड स्व. अजित पवार के नाम या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले.
नंदुराबर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने लोकनेते स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात जनसेवा सप्ताहांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता मालती वळवी होत्या. मतदान जागृती, महिला सक्षमीकरण, आदिवासी हक्क, पर्यावरण, आरोग्य, शेतकरी व कृषी विकास, युवक रोजगार, कौशल्य व स्वच्छता याविषयी जनजागृती केली जात आहे. याप्रसंगी छोटू कोकणी, कविता छोटू कोकणी, कविता वाघ,  सुपड्या प्रताप वळवी, सविता वळवी, सुरूपसिंग कांतीलाल वळवी, सरिता सुरूपसिंग वळवी, जसपाल रतिलाल कोकणी, सुगंधा जसपाल कोकणी, बाबुराव राजला कोकणी, पनेश गोकुळ कोकणी, दिपाली  कोकणी, मोहित छोटू कोकणी, महेश राजेंद्र वळवी, विवेक छोटू कोकणी, पवन कोकणी आदी उपस्थित होते.