Home अध्यात्म आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक...

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने

1
On the occasion of Ashadhi Shuddha Ekadashi, Chief Minister Devendra Fadnavis, accompanied by his wife, performed the official *Mahapuja* of Lord Vitthal and Goddess Rukmini, alongside the honoured *Warkari* Babasaheb Madhav Mane.

प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्यासमवेत केली.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांच्या उत्तम सोयीसाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कारसमारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 👇🏾

🟠 मागील काळात सुरू केलेले मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना केली आहे.

🟠यावेळी वारीने एक नवा उच्चांक गाठत २५ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली. परंतु, कोणीही नाराज न होता, न थकता आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेत आहेत.

🟠चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेतली आहे. पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल, अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो.

🟠 लाखो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात. अनेक वारकरी कळसाच्या दर्शनावरच समाधान मानतात. या अनोख्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे, ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीने केलेली पूजा आहे.

🟠येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील आहे. विठुरायाची सेवा जरी आपल्याला करता आली नाही, तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे, यासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

⏺️मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने (मु.पो. गौरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) यांचा महापूजेनंतर मुख्यमंत्री तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना एसटी महामंडळाकडून वर्षभर मोफत एसटी प्रवास पास वितरित करण्यात आला.

⏺️ ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी, वृक्षसंवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देण्यात आला.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

#श्रीविठ्ठलरखुमाई#महापूजा#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#शेतकरी#चंद्रभागा#कॉरिडॉर#वारकरी#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR