Home टेक न्युज अहिल्यानगर जिल्ह्यासह नांदेड, आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी...

अहिल्यानगर जिल्ह्यासह नांदेड, आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला

1
Various elected representatives and office-bearers of the 'UBT' faction from Ahilyanagar, Nanded, and Pune districts embraced the saffron flag of the Shiv Sena in the presence of Deputy Chief Minister Eknath Shinde.

ठाणे(प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, राहता, अकोले, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा येथील तसेच नांदेड आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
यात प्रामुख्याने खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूरचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, तर नेवासाचे उपजिल्हाप्रमुख हरिराम शेळके, नीरज नागरे, पंकज लांभाटे, नितीन जगताप, राहूरीचे डॉ.अजय म्हसे, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, अकोलेचे महेंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, शिर्डी राहताचे अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहोर आणि कोपरगावचे मुकूंद सिनकर, सचिन मलिक, अशोक पवार आणि त्यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उबाठा गटाचे
तालुकाप्रमुख नितीन शिंदे, भीमराव भोसले, सुधीर पाटील, इंदापूर शहरातील महादेव सोमवंशी, प्रवीण देवकर यांनी तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली गणेश धायगुडे, विजय थिटे, विजयकुमार देवकाते डॉ.राहुल शंख यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.  दौंड विधानसभा क्षेत्रातील दत्तात्रय शितोळे, संपत शिंदे, विजय गुंड, माजी जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, विश्वास मांढरे, निलेश मदने, शहाजी दळवी, परेश भापकर यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विजयकुमार पाटील सुगावकर, संजय रावणगावकर, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील धामणगावकर या पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार रवींद्र फाटक, बालाजी पाटील खतगावकर, माजी खासदार आनंद परांजपे, तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.