(मोड) विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कुल व गौरव कनिष्ठ महाविद्यालय आमलाड येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ललित पाठक उपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका मयुरी पवार यांनी केले.लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन फुलहार टाकून करण्यात आले. याप्रसंगी प्री प्रायमरी च्या चिमुकल्यानी विविध वेशभूषा केले होते यात लोकमान्य टिळक ची नैतिक खैरनार, झाशी ची राणी ची गारगी चौधरी,भगतसिंग ची शिवम पाडवी व जिजामाता ची मिहिका गुरव यांनी वेशभूषा केली होती.
यावेळी इ.१ ली ते इ. १२ वी ह्या वर्गांसाठी वक्तृत्व स्पर्धा व प्री प्रायमरी साठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.वक्तृत्व स्पर्धा चे परिक्षण किरण वळवी व अमरसिंग वळवी तर चित्रकला स्पर्धेचे परिक्षण कला शिक्षक श्रावण सुर्यवंशी यांनी केले.त्यातून प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना योग्य बक्षीस उपस्थित्यांच्या हस्ते देण्यात आले.प्राचार्य पवार,ललित पाठक व शिक्षक निलेश धोडरे यांनी आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतले.यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार शिक्षक दशरथ वसावे यांनी मानले.