
यावेळी शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर, कार्यरत व रिक्त पदांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याचबरोबर विविध संस्थांच्या इमारतींची सद्यस्थिती, शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाचा वापर, खर्च व शिल्लक निधी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सद्यस्थिती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रक्रिया तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा मंत्री दादाजी भुसे यांनी सविस्तर आढावा घेतला.
ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालयांच्या शाळा नाहीत तेथे त्या सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिसरातील इतर शाळांमधून प्राथमिक प्रशिक्षण द्यावे, शासकीय विद्यानिकेतनमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.















