Home सरकारी योजना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा...

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला

0
A review of the Nhava-Sheva Phase-3 water supply scheme was conducted under the chairmanship of Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे दरम्यान जलवाहिनी टाकण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी परस्पर समन्वयातून तातडीने दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल मंडळामार्फत राबविण्यात येणारी ही २२८ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेची योजना असून, त्यापैकी १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पनवेल महापालिकेसाठी आरक्षित केले आहे. योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वित न झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे.

यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बबन मुकादम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#पनवेल

#पाणीपुरवठायोजना