Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न

नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न

0
Merit Felicitation and Reception Ceremony Organized by the Maratha Community of Nandurbar and Dhule Districts

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ व जिल्हा युवा उन्नती मंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हास्तरीय मराठा समाज गुणगौरव व सत्कार समारंभ 2026” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन लिंबाई भवन, गुरुकुल नगर, नंदुरबार येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व अध्यक्ष, नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज उन्नती मंडळ पांडुरंग महादू मराठे होते.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अरुण शांतिलाल साळुंखे, रा. नंदुरबार यांचा विशेष गौरव सन्मानाने करण्यात आला. त्यांच्या समाजसेवा आणि कार्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून किरण सुपडू काळे, संचालक, ईटल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, बेंगळुरू तसेच डॉ. महेश धर्माजी बोरसे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, ग्रीन ओझ केअर अँड पॉलिमर्स प्रा.लि. कल्याण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग हंचन गायकवाड, अध्यक्ष, रुरल एज्युकेशन सोसायटी, दाताळी, विकास बाबासाहेब गुंजाळ, पोलीस उपनिरिक्षक आणि याबूबा हिरामण मराठे, संचालक, अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल वासुदेव वायकर, जिल्हा सचिव, डॉ. प्रा. संजय माधव उगले, जिल्हा सहसचिव, शांतिलाल पाडू गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष, भुषण जगन्नाथ चव्हाण, जिल्हा युवाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कर्मचारी सत्कार केल्यामुळे संपूर्ण मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.