Home शैक्षणिक श्री म्युझिक पखवाज विद्यालयातर्फे घाटकोपर येथे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न

श्री म्युझिक पखवाज विद्यालयातर्फे घाटकोपर येथे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न

2
'Guruvandana' program organized by Shree Music Pakhawaj Vidyalaya concludes in Ghatkopar.

घाटकोपर(प्रतिनिधी):-आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात, ज्या फक्त शिकवत नाहीत, तर आयुष्य जगण्याची प्रेरणाही देतात. श्री म्युझिक यू ट्यूबची मालिका पखवाज गुरु या माध्यमातून पखवाजचे ऑनलाईन क्लास जगभरात आहेत अशा विविध ठिकाणी ते पखवाजचे ऑनलाईन शिक्षण देत असतात व घाटकोपर,मुंबई येथे ऑफलाईन क्लास चालतो भजन,कीर्तन, तसेच पखवाज सोलो क्लासिकल पद्धतीने शिकवले जाते याचं सर्व क्लासच्या  विद्यार्थ्यांनी प्रथमच गुरुपौर्णिमेनिमित्ताने 2 ऑगस्ट 2026 रोजी, सुवर्णराजा सभागृह, भटवाडी, घाटकोपर येथे
संगीत भूषण, पखवाज विशारद गुरुवर्य श्रीकांत लक्ष्मण गुरव
यांना शिष्यांच्यावतीने
गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात  सुरवातीला दीपप्रज्वलन, श्री गणेश स्तवन, श्री सरस्वती स्तवन सुस्वर आवाजात सादर करण्यात आले गायिका: लावण्या गुरव, तेजस्वी जाधव, रागिणी जाधव, प्राची किजबिले त्यानंतर गुरुवर्य श्रीकांत लक्ष्मण गुरव यांचे मंत्रमुग्ध करणारे सोलो वादन झाले त्यांना संवादिनी साथ: शुभदा गायकवाड (MA)यांनी केली.
त्यानंतर विराज धुरी, गंधर्व गुरव, पार्थ प्रभू, श्रवण कोकरे, वैभव सावंत, दत्तप्रसाद मेस्त्री, महादेव शिर्के, विराज घाडी, स्वरूप शिंदे, शशांक परब, आर्यन जुवेकर, विघ्नेश मुळम, विनायक मांडवकर या विद्यार्थ्यांनी पखवाज सोलो वादन केले संवादिनी साथ: हनुमंत पाळेकर यांनी केली. या सोहळ्यास भजनसम्राट: लक्ष्मण गुरव बुवा, कोकणरत्न: भगवान लोकरे बुवा, प्रमोद हर्याण बुवा, प्रमोद धुरी बुवा, अरुण राणे बुवा, ज्येष्ठ पखवाज वादक: विजय पालव , चंद्रकांत देसाई बुवा, नाना पानसे घराण्याचे जेष्ठ पखवाज वादक: जगन्नाथ कोळी (नवी मुंबई), उत्कृष्ट पखवाज वादक: योगेश जगताप, असे दिग्गज मान्यवर या सोहळ्यास उपस्थितीत होते त्या नंतर या मान्यवरचा सत्कार करण्यात आला  नंतर मान्यवरांचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांनी अप्रतिम निवेदन केले. ह्या कार्यक्रमास Indy ढोल ताशा पथक,(USA), तृप्ती, उद्योजक: पंडित कोकाटे, सौ.स्मिता गाडगीळ, भाई सावंत, चंद्रकांत धुरी, रविंद्र गुरव (मामा),विजय मांजलकर, लवू घोगळे, संजय गुरव, प्रथमेश घाडी,सुनील एकावडे, प्रमोद घाडी, रवी घाडी, लक्ष्मण घाडीगावकर, ओंकार गुरव, राजू गुरव, नंदन गुरव, प्रकाश गुरव, विनायक पळसमकर, नारायण मसुरकर, जयवंत घाणेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.