Home नंदुरबार जिल्हा नंदनगरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा शहरात शोभायात्रा;विठ्ठलनामाचा गजर,महाप्रसादाचे वाटपासह कार्यक्रम

नंदनगरीत संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा शहरात शोभायात्रा;विठ्ठलनामाचा गजर,महाप्रसादाचे वाटपासह कार्यक्रम

1
A ceremonial procession was held in the city to mark the *Sanjivan Samadhi* (final meditative repose) anniversary of Saint Namdev Maharaj; the event featured the chanting of Lord Vitthal's name and the distribution of *Mahaprasad*.

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदनगरीत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी उद्योगपती तथा
प्रा. डॉ. रविंद्र चौधरी, न. पा. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मध्यवर्ती शिंपी समाज संस्थेचे  राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष सावळे, माजी समाज अध्यक्ष   रामचंद्र पवार, निवृत्त मुख्याध्यापक लोटन बाविस्कर व डी. आर. हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य   संजय सैंदाणे उपस्थित होते.
शहर श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ शिंपी अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. रविंद्र चौधरी, न. पा. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी प्रतिमा व पालखीचे पूजन केले. महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्षा सरिता भामरे, गोणाई महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता जाधव, अध्यक्ष सोमनाथ शिंपी व उपाध्यक्ष शैलेश शिंपी यांनी मनोगते व्यक्त केली. उद्योगपती प्रा. डॉ. रविंद्र चौधरी म्हणाले की, समाज भवन उभारण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष  चौधरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून निधी उपलब्ध करून देईल तसेच आमच्या परिवाराकडून देखील काही मदत लागल्यास ती देखील करणार.
उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी म्हणाले की, समाजासाठी काम करण्याच्या माझे दादा आदरणीय स्वर्गीय काकासाहेब यांनी आमच्या परिवाराला जो वारसा दिला त्याच्या मी एक भाग आहे त्याच्या मला अभिमान व आदर आहे त्याच पद्धतीने मी देखील समाजकार्यात सदैव उभा राहण्याच्या प्रयत्न करणार. माजी नगरसेवक तथा शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शिंपी म्हणाले की, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या खरा इतिहास समाजासमोर मानला जात नाही त्यांची 17 वे वंशज यांनी सांगितले की नामदेव महाराजांच्या पिढीतील 13 व्यक्तींनी समाधी घेतली आहे तसेच जनाबाई ह्या धनगर समाजाच्या होत्या परंतु त्यांची संत नामदेव महाराजांच्या प्रति असलेली भक्ती करून त्यांनी देखील समाधी घेतली आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हरिनाम गजर करत नाचत गात तेलीवाडी येथून शोभायात्रा काढण्यात आली. ती गणपती मंदिरमार्गे कुकरमुडेकर महाराजांच्या विठ्ठल मंदिरात महाआरती भेट, भजन-कीर्तनात समाजातील महिला व पुरुष दंग झाले होते. महाप्रसादाचे वाटप  करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष सोमनाथ उपाध्यक्ष शैलेश शिंपी, सचिव प्रदीप शिंपी, सदस्य गजेंद्र शिंपी, बळवंत निंकुभ, प्रमोद सोनवणे, अनिल शिपी, मोहन भामरे, वैभव करवंदकर, विजय देवरे, योगेश खैरनार, दिनेश पवार, विवेकानंद चव्हाण, हितेश अहिरे, प्रवीण सोनवणे, आनंद सोनवणे, महेंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, बिपीन चव्हाण, रोहित शिंपी, आशिष कापडणे, महेश करवंदकर, प्रसाद शिंपी यांच्यासह असंख्य समाजातील युवकांनी महाप्रसादाचे वाटप केले. प्रदीप शिंपी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.