Home नंदुरबार जिल्हा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची खडकीतील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट; दिव्यांग जवानांच्या...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची खडकीतील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट; दिव्यांग जवानांच्या पुनर्वसन कार्याची घेतली माहिती

0
Governor Jishnu Dev Varma visits the Paraplegic Rehabilitation Centre in Khadki; reviews rehabilitation efforts for differently-abled soldiers.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी खडकी येथील ‘पॅराप्लेजिक’ पुनर्वसन केंद्राला भेट देऊन दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विशाल अग्रवाल, संस्थेचे संचालक कर्नल रतन कुमार मुखर्जी आदी उपस्थित होते.

युद्ध, सैन्य मोहिमेदरम्यानच्या कार्यावर असताना दिव्यांग झालेल्या जवानांच्या शारीरिक, मानसिक पुनर्वसनाचे काम या संस्थेत होत असल्याची माहिती मेजर जनरल अग्रवाल आणि कर्नल मुखर्जी यांनी यावेळी दिली. राज्यपाल यांनी संस्थेतील पुनर्वसन झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तर आदींमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी संस्थेतील दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या छायाचित्र दालनाला भेट दिली.

राज्यपालांनी दिव्यांग जवानांनी बनवलेल्या वस्तू पाहिल्या. माउथ पेंटिंग करणारे चित्रकार जवान यांच्याशी त्यांनी विशेष संवाद साधला आणि त्यांच्या कलेला दाद दिली. संस्थेतील पुनर्वसनाच्या विविध भागांसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आर्थिक सहाय्य मिळते, असे यावेळी राज्यपालांना सांगण्यात आले.