Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवानासाठी मुदतवाढ

जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवानासाठी मुदतवाढ

16
Nandurbar District
Nandurbar District

(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यातील सद्यस्थितीत रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवाना मंजुरीसाठी बचतगट, संस्था यांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे. (Extension for new licenses for canceled and resigned ration shops in nandurbar district)

जिल्ह्यात 15 दुकानांसाठी नवीन जाहिरनामा

नंदुरबार तालुक्यात 7, अक्कलकुवा 5, व शहादा 3 असे एकूण जिल्ह्यात 15 दुकानांसाठी नवीन जाहिरनामा काढण्यात आला असून प्रस्तावित रास्तभाव दुकान मंजूरीचे नियम व अटी शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय तसेच जिल्ह्याच्या www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही श्री. मिसाळ यांनी कळविले आहे.