(नवी दिल्ली) भारत सरकार गावागावात २ कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसोबत काम करत आहे.15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कर्ज आणि ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. “ड्रोन की उडान” उपक्रम महिला स्वयं-सहायता गटांद्वारे राबवला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सांगितलं.देशातील १० कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. “आज खेड्यापाड्यात, बँकेत, अंगणवाडीत आणि औषध देण्यासाठीही दीदी उपलब्ध आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. (Women’s SHGs to power Drone Ki Udaan: Prime Minister)
ड्रोन की उडान : महिला स्वयं-सहायता गटांना ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण
कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की 15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कर्ज आणि ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. “ड्रोन की उडान” उपक्रम महिला स्वयं-सहायता गटांद्वारे राबवला जाईल, असं पंतप्रधान म्हणाले.
![Drone Ki Udaan](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Womens-SHGs-and-Drone-Ki-Udaan-1024x576.jpg)
ड्रोन की उडान : देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महिला-प्रणित विकास आवश्यक
नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक असल्याचे भारत आज अभिमानाने सांगू शकतो असे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले. महिला वैज्ञानिक देखील चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की त्यांनी जी – 20 मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मुद्दा मांडला आहे आणि जी 20 देशांनी तो स्वीकारला आहे आणि त्याचे महत्त्व ओळखले आहे. ‘नारी सन्मान’ बद्दल बोलताना, पंतप्रधानांनी त्यांच्या एका परदेश दौऱ्यातील एक अनुभव सांगितला, जिथे त्या देशाच्या एका वरिष्ठ मंत्र्याने त्यांना भारतातील महिला विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतात का असं विचारले होते . त्यावर आपण उत्तर दिले की आज आमच्या देशात STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे आणि आज जग आपल्या या क्षमतेकडे पाहत आहे असे पंतप्रधानांनी सांगितलं.
![Drone Ki Udaan](https://nandurbarnews.in/wp-content/uploads/2023/08/Womens-SHGs-to-power-Drone-Ki-Udaan-1024x576.jpg)
Women’s SHGs to power Drone Ki Udaan: Prime Minister Narendra Modi
Addressing the nation from the ramparts of the Red Fort on the 77th Independence Day today, Prime Minister Shri Narendra Modi has said that the Government is working with Women’s Self Help Groups (SHGs) with the aim of creating 2 crore ‘Lakhpati Didis’ in villages. The PM observed that 10 crore women are today associated with Women’s Self-Help Groups. “In villages today, one can find a Didi in the Bank, in the Anganwaadi and a Didi to provide medicines.”
The Prime Minister spoke about agri-tech and made a pitch for leveraging the potential of science and technology in rural development. The PM said that 15,000 Women’s Self-Help Groups would be given loan and training for operating and repairing drones. “Drone ki Udaan” will be carried out by these Women’s Self-Help Groups, said the PM.