(नंदुरबार) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 23 ऑगस्ट 2023 रोजी नंदुरबार येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. (Camp to rectify caste validity certificate errors)
जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलारोड नंदुरबार येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्राची वाजे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. यासाठी सर्व अर्जदारांनी शिबीरास उपस्थित राहून आपल्या अर्जातील त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहनही श्रीमती वाजे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.