(अक्कलकुवा) नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे याची जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट (8848.46 मी.) व जगातील चवथ्या क्रमांकाचे शिखर हे माऊंट ल्होत्से (8516 मी.) हे दोन्ही शिखर सर करण्याच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी निवड झाली आहे.एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल वसावे (Nandurbar News) हा दि. 3 एप्रिल 2024 ते 7 जुन 2024 या दरम्यान हे शिखर सर करणार आहे.
जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट व जगातील चवथ्या क्रमांकाचे शिखर माऊंट ल्होत्से हे दोन्ही शिखर सर करण्याची व विश्वविक्रम करण्याची दुहेरी संधी गिर्यारोहक अनिल वसावे याला मिळाली आहे. ही संपुर्ण मोहिम दि. 3 एप्रिल 2024 ते 7 जुने 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

अनिल वसावे कोण आहे ? Who is Anil Vasave ?
अनिल वसावे हा एक भारतीय गिर्यारोहक आहे. किलिमांजारो शिखरावर चढणारा हा महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पहिला गिर्यारोहक आहे. तसेच तो सध्या खान्देश एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. गिर्यारोहक अनिल वसावे हा नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील रहिवासी आहे. अनिल वसावे याने यापुर्वी २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता किलीमांजारो शिखरावर चढाई केली होती. तेथे त्याने भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचली होती. (Anil Vasave is an Indian mountaineer. He is the first mountaineer from the Tribal community from Nandurbar District of Maharashtra to climb Mount Kilimanjaro’s peak.)
अनिल वसावे याने आतापर्यंत जगभरातील कोणती शिखरे सर केलेली आहेत ?
गिर्यारोहक अनिल वसाने याने आतापर्यंत अफ्रिका खंडांतील उंच शिखर किलोमांजरी व व युरोप खंडातील उंच शिखर माऊंट एलबर्स व माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केले आहे. अशी कामगिरी करणारे तो पहिलाच आदिवासी तरुण आहे. आता एव्हरेस्ट सर करुन एक नवीन कामगिरी करून तो सातपुड्याचा लौकीक वाढवणार आहे. सोबतच त्याने सतोपंत हे शिखर देखील सर केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यामधील पहिला एव्हरेस्टवीर होण्यासाठी अनिल वसावे प्रयत्नशील
नंदुरबार जिल्ह्यामधील पहिला एव्हरेस्टवीर होण्यासाठी आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे हा सातत्याने प्रयत्न करत आहे. यापुर्वी देखील त्याने अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केले आहेत. मागील मोहिमेतून झालेल्या दुखापती मधुन सावरून तो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. जगातील सर्वात उंच शिखर व त्याजवळ असलेले जगातील चौथा क्रमांकअसलेले शिखरअसे दुहेरी शिखर सर करून एकअभिमानाची कामगीरी करण्यासाठी तो सज्ज होत आहे. या मोहिमेमुळे आपल्या देशाचे नाव लौकिकात भर पडणार आहे. गिर्यारोहक अनिल वसावेला याआधी आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात आली असून आता त्याला ३२ लाख एवढी रक्कम या मोहिमेसाठी लागणार आहे. यासाठी त्याने विविध खाजगी कंपनी व एनजीओ यांच्या कडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

नंदुरबार वासियांची मला मोलाची साथ : अनिल वसावे
नंदुरबार न्युज शी (Nandurbar News) बोलतांना तो म्हणाला की, नंदुरबार वासियांनी जी साथ दिली आहे त्याबाबत मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.अशी भावनिक प्रतिक्रिया गिर्यारोहक अनिल वसावे याने व्यक्त केली आहे. मागील मोहिमांसाठी सर्व वयोगटातील व्यक्तींनी मला जी साथ दिली, त्यांचे मी आभार मानणार नाही तर त्यांचा सदैव ऋणी असेल. मोहिम जरी पुढील वर्षी असली तरी आता पासून त्यासाठी तयारी करत असून कोणत्याही परिस्थितीत स्वप्न पूर्ण होईलच असा विश्वास त्याने व्यक्त केला.