Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अनोखे रक्षाबंधन..!!

नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अनोखे रक्षाबंधन..!!

7
Rakshbandhan at S P Office Nandurbar
Rakshbandhan at S P Office Nandurbar

(नंदुरबार) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामगिरीनिमित्त व मागील महिन्यात सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून माता-भगिनींचे सौभाग्याचे लेणे अर्थातच मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीकडून हस्तगत केल्यामुळे कृतज्ञता म्हणून यंदाचा रक्षाबंधनाचा सण पोलीसांसोबत साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले होते.

नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात रक्षाबंधनाचा कार्यक्रम

त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती सीमा सोनगरे व पदाधिकारी यांनी दिनांक 29/08/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एक छोटेखानी पण दिमाखदार असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करुन उपस्थित सर्व महिला भगिनींनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समाजातील सर्व माता-भगिनींच्या संरक्षाणासाठी सदैव तत्पर राहू असे वचन दिले. (Nandurbar News)

पोलीसांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करतांना मनस्वी आनंद : सीमा सोनगरे

कार्यक्रमाला उपस्थित नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, कोणताही सण असो पोलीसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी नेहमी कर्तव्यावर हजर राहावे लागत असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या परिवारासोबत कुठलाच सण साजरा करता येत नाही अशावेळी रक्षाबंधणाचा सण एवढ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर व जिल्हा महिला आघाडीचे आभार व्यक्त केले. तसेच जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती सीमा सोनगरे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्हा पोलीस दल फक्त रक्षाबंधनाच्या सणानिमित्तच नाही तर समाजातील सर्व माता, भगिनी यांच्या सरंक्षणासाठी सदैव तत्पर आहे. मागील महिन्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करुन सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून माता-भगिनींचे सौभाग्याचे लेणे अर्थातच मंगळसुत्र चोरणाऱ्या टोळीकडून हस्तगत करुन यापूर्वीच त्यांना परत दिलेले आहे. त्यामुळे पोलीसांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करीत असतांना त्यांना मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Nandurbar News)

Rakshabandhan at S P Office Nandurbar

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करुन रक्षाबंधनाची भेट

मंगळसुत्र हे स्त्रीच्या भावनांशी निगडीत असते, त्यामुळे कोणी अज्ञात चोरटा ते तिच्याकडून हिसकावून नेतो तेव्हा तिला प्रचंड मानसिक त्रास होतो. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री मंगळसूत्रला सौभाग्यच प्रतीक समजते, म्हणून मंगळसूत्र स्त्रीयांसाठी खूप महत्वाचा दागिना असतो. परंतु नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करुन रक्षाबंधनाच्या अगोदरच सौभाग्याचे प्रतिक परत करुन एकाप्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली. सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अजय वसावे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. इशामोद्दीन पठाण, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक बुधवंत, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कैलास वाघ, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश वानखेडे, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार बागुल, महिला सहाय्य कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवेरे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती सीमा सोनगरे, जिल्हा सरचिटणीस श्रीमती उषा वळवी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती रचना परदेशी, जिल्हा चिटणीस श्रीमती सोनल चव्हाण, सचिव श्रीमती सीमा पाडवी, सदस्य श्रीमती कांचन मोरे, श्रीमती चेतना भामरे, श्रीमती श्रेया सोनगरे इत्यादी उपस्थित होते. (Nandurbar News)