(तळोदा) नवीन शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद शाळा आष्टे तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. (Nandurbar News)
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत जिरे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य, स्वच्छता, पाणी यावर विद्यार्थ्यांना खूप सुंदर माहिती सांगितली. औषध निर्माण अधिकारी दिगंबर चव्हाण व आरोग्य सेविका अक्का पावरा यांनी विद्यार्थ्यांना औषध उपचार केले व तीन विद्यार्थ्यांना रेफर करण्यात आले. यावेळी 152 विद्यार्थ्यांपैकी 148 विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी मुलांना औषध उपचार करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्यध्यापक कैलास लोहार, ज्येष्ठ शिक्षक राजू सामुद्रे, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी उपस्थित होते. (Nandurbar News)