Home अक्कलकुवा अक्कलकुवा वनक्षेत्रातील सातपुड्यातील पर्वत रांगांमध्ये अस्वलाचा वावर

अक्कलकुवा वनक्षेत्रातील सातपुड्यातील पर्वत रांगांमध्ये अस्वलाचा वावर

50
Bear activity in Satpura mountain near Akkalkuwa forest area
Bear activity in Satpura mountain near Akkalkuwa forest area

(अक्कलक्कवा) अक्कलक्कवा वनक्षेत्रातील सातपुडा पर्वत पायथ्यालगत असलेल्या नवलपुर व सिंगपूर या गावातील तरुणांवर दोन वेगवेगळ्या घटनांत अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतांना काल दि. ४ रोजी दुपारी २ ते ३ वाजे दरम्यान तीन अस्वल मुक्त संचार करत असल्याचे नवलपुर येथील शेतकऱ्यानी पाहीले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुर याच्या प्रंचड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Bear activity in Satpura mountain near Akkalkuwa forest area) (Latest Nandurbar News)

Bear activity in Satpura mountain near Akkalkuwa

ग्रामीण भागातील जनता बिबट आणि अस्वलाचा भितीच्या सावटाखाली

या दरम्यान गावातील तरूण वर्गाने दगड मारून त्यांना वन हद्दीत पळून लावले. वन विभागाने ठोस उपाययोजना करुन अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. कामासाठी शेतात जाताना अस्वल अचानक पाठी मागे येवून त्याच्या हल्ला करुन डोक्यावर, छातीवर कमरे गंभीर जखमी केल्याचा दोन घटना घडल्या आहेत. पावसाची उघडीप असल्याने सर्वत्र शेतीची कामे सुरू आहेत. यांत कधी बिबट्या तर कधी अस्वलाचा हल्ल्याने तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांत भितीचे वातावरण आहे. मनुष्य सुरक्षित व भयमुक्त राहील असे कुठलेही ठोस उपाययोजना वनविभागाने  केलेली नाही.ग्रामीण भागातील जनता बिबट आणि अस्वलाचा भितीच्या सावटाखाली जीवन जगतो आहे. (Latest Nandurbar News)