Home तळोदा Maratha Morcha: मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा तळोदा मराठा समाजातर्फे निषेध

Maratha Morcha: मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा तळोदा मराठा समाजातर्फे निषेध

13
Maratha Samaj Taldoa
Maratha Samaj Taldoa

(तळोदा) जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधव गाव अंतरवाली-सराटी, येथे मराठा समाज बांधव सनदशिल व शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत होते. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटने विरोधात व दडपशाही सरकारच्या तीव्र निषेध यावेळी सर्व तळोदा मराठा समाज बांधव करीत असलेले निवेदन तळोदा मराठा समाजातर्फे तहसिलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले आहे.  (Latest Nandurbar News)

मराठा समाज बांधवांच्या मनात अतिशय संतापाची भावना

जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधव गाव अंतरवाली-सराटी, येथे मराठा समाज बांधव सनदशिल व शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत होते. परंतु मुद्दाम सामाजिक वातावरण बिघडावे म्हणून आंदोलकांवर पोलिसांकडून अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज केला गेला ही घटना कुणाच्या सांगण्यावरून या मराठा आंदोलकांवर इतक्या अमानुषपने लाठी मार करण्यात आली. महिला आंदोलक रक्तबंबाळ होऊन गंभीर स्वरूपाच्या जखमी झालेल्या आहेत. तरी त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या मनात अतिशय संतापाची भावना संबंधितांनी निर्माण केली आहे.मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटने विरोधात व दडपशाही सरकारच्या तीव्र निषेध यावेळी सर्व तळोदा मराठा समाज बांधव करीत असलेले निवेदन तळोदा मराठा समाजातर्फे तहसिलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले आहे. (Latest Nandurbar News)

Maratha Morcha
Maratha Morcha

न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

तसेच या घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार राहील. यावेळी निवेदन प्रमुख ताराचंद शिंदे, नवनीत शिंदे, सुधीर शिंदे, कांतीलाल भापकर, आनंदा चौधरी, विनोद चव्हाण, शांताराम बाबूराव मराठे, शांतीलाल गायकवाड, दिनेश फोके, शिवाजी जाधव, धनराज मराठे, अभिमन्यू मराठे, रवींद्र गाडे, विश्वनाथ बोराणे, राजेंद्र मराठे, रोशन गागरे, दिनेश शिंदे, संतोष मराठे, जिग्नेश मराठे, भावेश मराठे, देवेंद्र साळुंखे, हर्षल नवले, नितीन शिंदे, दिपक भापकर, राकेश तनपुरे, मंगेश तनपुरे, धनराज मराठे, नितीन गागरे, अजय साळुंखे, कल्पेश मराठे, प्रल्हाद मराठे, ब्रिजलाल चव्हाण, भटू मराठे, शरद मराठे, दिलीप मराठे, अमृत गायकवाड, प्रल्हाद बोराणे, चुडामन बोराने, शिरीष जगदाळे, सुभाष पवार, शांताराम मराठे, सुभाष शिंदे, मंगा मराठे, अंबालाल पाचोरे, पुरुषोत्तम चव्हाण, अंबालाल नवले, प्रवीण नवले, योगेश तत्ते, युवराज मराठे, आशिष पवार, दिलिप जाधव, मुकेश साळुंखे, गणेश शिंदे, विजय मराठे, महेश पाचोरे, शांताराम पाचोरे इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latest Nandurbar News)