ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या तालुक्याला न जाता थेट त्यांच्या गावातच ऐकून घेऊन सोडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत ग्राम संवाद अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी मौजे मलगाव (ता. शहादा) येथे हा उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भूषविले. यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. सागर चौधरी, महसूल नायब तहसीलदार श्री. पानपाटील रावसाहेब, मंडळ अधिकारी श्री. शशीधर सावळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. आप्पा कोकणी, ग्राम महसूल अधिकारी श्री. सतीश वसावे व श्री. रेहमल पावरा, सहायक कृषी अधिकारी श्री. अर्जुन पवार, वैद्यकीय अधिकारी श्री. संतोष पावरा यांसह विविध विभागांचे कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अभियानाचे ठळक मुद्दे:
⦁ ग्राम संवाद अभियानाचे महत्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले गेले.
⦁ नागरिकांना त्यांचे प्रश्न व तक्रारी मांडण्यासाठी प्रवृत्त केले गेले.
⦁ तातडीने सोडवता येणाऱ्या समस्या जागेवरच चर्चेद्वारे निकाली काढण्यात आल्या.
⦁ दीर्घकालीन व पायाभूत सुविधा संबंधित मागण्यांबाबत आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले गेले.
प्रमुख चर्चा विषय:
1. आरोग्यविषयक समस्या व उपचार सुविधा
2. आयुष्मान भारत योजना व लाभधारकांना मार्गदर्शन
3. कृषीविषयक अडचणी व अॅग्रीस्टॅक नोंदणी
4. पीएम किसान सन्मान निधी योजना
5. महसूल विभागातील प्रकरणे व वन हक्क दावे
6. जन्म नोंदणी प्रक्रिया
7. वीजपुरवठा व जल जीवन मिशन
8. शालेय सुविधा व शैक्षणिक प्रश्न
विशेष मार्गदर्शन:
मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी वनपट्टे दाव्यांवरील समस्या प्रत्यक्ष ऐकून मार्गदर्शन केले.
बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. सागर चौधरी यांनी नागरिकांना आयुष्मान कार्ड व सिकल सेल उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. पावरा यांनी केले. शेवटी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी तरुण युवकांशी संवाद साधत प्रशासनाबद्दल विश्वास वाढविण्याचे काम केले.
ग्रामस्थांनी प्रशासनाशी थेट संवाद साधल्याबद्दल समाधान व्यक्त केले व सर्व विभागांचे आभार मानले.

.#ग्रामसंवादअभियान#nandurbar#shahada#Malgaon#ruraldevelopment#publicparticipation#governmentschemes2025#वनहक्क#PMKisan#AyushmanBharat#जलजीवनमिशन