तळोदा (जि. नंदुरबार)
परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 850 गट गावस्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मौजे प्रतापूर, तळोदा येथे आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय, शहादा येथील कीडरोग शास्त्रज्ञ श्री. कुणाल पटेल प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. विलास निकुंभ, कृषी उपअधिकारी श्री. विकास अहिराव, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. शिलदार पावरा व श्री. दीपक पावरा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांना दिलेले मार्गदर्शन:
⦁ सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
⦁ ट्रायकोडर्मा, मेटारायझिंग, निमोर्क, एस-नाईन, कल्चर इत्यादींचा शेतकऱ्यांनी पीक संरक्षण व सेंद्रिय शेतीसाठी कसा उपयोग करावा याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.
⦁ शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या पर्यायाप्रमाणे सेंद्रिय पद्धती स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रशिक्षणास रामपूर, माळ खुर्द, करडे गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विपुल चौधरी (बीटीएम) यांनी केले.
या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत प्रत्यक्ष अनुभव व योग्य तांत्रिक माहिती मिळाली असून, परंपरागत व शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.
#परंपरागतकृषीविकासयोजना#सेंद्रियशेती#शेतकरीप्रशिक्षण#नंदुरबार#तळोदा#organicfarming#farmertraining
















