
नंदुरबार |
सन 2022-2023 मध्ये राज्यस्तरावर स्काऊट गाईड क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा हॉल येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख प्रमाणपत्र वितरण जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, श्रीमती रत्नाताई रघुवंशी (माजी नगराध्यक्ष व जिल्हा आयुक्त गाईड), श्रीमती वर्षा जाधव (जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड) व श्रीमती वंदना वळवी (शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद नंदुरबार) यांच्या शुभहस्ते झाले.
या कार्यक्रमात एकूण 111 स्काऊट, 114 गाईड, तसेच 35 स्काऊटर व गाईडर यांनी सहभाग घेतला.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. महेंद्र वसावे (जिल्हा संघटक स्काऊट) व श्री. हेमंत पाटील (लिडर ट्रेनर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट) यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती संगीता रामटेके (जिल्हा संघटक गाईड) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. ज्ञानेश्वर सावंत व श्री. योसेफ गावीत (जिल्हा लिपीक) यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा पुरस्कार वितरण सोहळा स्काऊट गाईड चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी क्षण ठरला असून जिल्ह्यातील युवा स्वयंसेवकांसाठी एक नवा आत्मविश्वास व ऊर्जा घेऊन आला आहे.

#ScoutGuideNandurbar#AwardDistribution#districtcollectornandurbar#YouthLeadership#ScoutingIndia#mittalisethi#nandurbarnews















