अक्कलकुवा तालुक्यातील मौजे गोटपाडा येथे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल (EMRS) संदर्भात जनजागृती करण्यात आली. या अनुषंगाने मा. श्री.अनय नवंदर (आयएएस) सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (तळोदा) व मा. श्री. विनायक घुमरे, तहसीलदार अक्कलकुवा यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांना या शाळेचे महत्त्व व फायदे समजावून सांगण्यात आले.
शाळेचा उद्देश:
सदर निवासी शाळा ही अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या मान्यतेने स्थापन केली जाणारी उच्च प्रतीची शैक्षणिक सुविधा आहे. या शाळेचा मुख्य उद्देश दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वांगीण शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.
शाळेची वैशिष्ट्ये:
⦁ निवासी व्यवस्था: विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सुसज्ज निवासी सोयी
⦁ शैक्षणिक गुणवत्ता: CBSE अभ्यासक्रमासोबत डिजिटल शिक्षण सुविधा
⦁ क्रीडा व कौशल्य विकास: आधुनिक क्रीडांगण व व्यावसायिक प्रशिक्षण
⦁ संस्कृती संवर्धन: स्थानिक आदिवासी कला, परंपरा व भाषेचा विकास
ग्रामस्थ्यांचा सहभाग:-
या जनजागृती बैठकीला ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल केवळ शिक्षण संस्था नसून, ती आदिवासी समाजाच्या भविष्याची मजबूत पायाभरणी करणारी संकल्पना आहे.

#एकलव्यशाळा#EMRSNandurbar#Akkalkuwa#TribalEducation#DigitalIndia#InclusiveEducation#TransformingTribalIndia#NandurbarForEducation
















