
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसराचा दौरा करत डामरखेडा व प्रकाशा पुल, तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भातील समस्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. श्रवणकुमार दत्त आणि SDM श्री. कृष्णकांत कनवरिया हे देखील उपस्थित होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध प्रत्यक्ष पाहण्या घेतल्या व उपाययोजनांचा आढावा घेतला.
प्रकाशा व डामरखेडा पुलांची पाहणी:
प्रकाशा परिसरातील तापी नदीवरील डामरखेडा पुल आणि प्रकाशा पुल याठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर पुलांची स्थिती, जलप्रवाह, दोन्ही गावांच्या जोडणाऱ्या मार्गांची सुरक्षितता तपासली गेली.
पिण्याच्या पाण्याची समस्या:
प्रकाशा गावातील स्थानिक नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले असून संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहादा तहसील कार्यालय येथे बैठक:
या दौऱ्यानंतर शहादा तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनविषयक आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये शहादा तालुक्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याच्या अनुषंगाने तालुका प्रशासन, पोलिस, महसूल, आरोग्य व जलसंपदा विभागासह अन्य संबंधित विभाग प्रमुखांनी भाग घेतला.
प्रमुख सूचना व निर्णय:
⦁ महत्त्वाच्या ठिकाणी आपत्कालीन संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे.
⦁ पूर व आपत्तीग्रस्त भागातील स्थलांतराची तयारी.
⦁ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था आखणे.
⦁ स्थानिक ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था यांना कार्यप्रणालीत सहभागी करणे.

#NandurbarCollector#DisasterPreparedness#PrakashaBridge#TapiRiver#Shahada#MonsoonPreparedness#DistrictAdministration#WaterSecurity#Nandurbar















