(नंदुरबार)
स्थळ: डी.आर. हायस्कूल आणि श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल
जिल्हा क्रीडा कार्यालय, नंदुरबारतर्फे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात व सहभागात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती व क्रीडाविषयक जाणिवा वाढवणे हा होता.
ऑलिम्पिक दिनानिमित्त आर्चरी (धनुर्विद्या) आणि बॉक्सिंग या खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कुस्तीपटू खाशाबा जाधव व हॉकी सम्राट मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांनी ऑलिम्पिकचा इतिहास, उद्दिष्टे आणि जागतिक महत्त्व विशद केले. यानंतर प्रशिक्षक योगेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बॉक्सिंगचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमास क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, राज्य हॉकी प्रशिक्षक भगवान पवार, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, शिक्षक हेमंत खैरनार, जगदीश बच्छाव, अशोक वसईकर आणि डॉ. मयुन ठाकरे (बॉक्सिंग संघटना) उपस्थित होते.
सूत्रसंचालन तुषार नांद्रे आणि आभारप्रदर्शन अशोक वसईकर यांनी केले.

#OlympicDay2025#MoveLearnDiscover#TogetherForSport#FitnessForAll#SportsUniteUs#RunJumpThrow#GlobalOlympicDay#NandurbarForSports