नंदुरबार : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नव-तेजस्विनी कार्यक्रम अंतर्गत महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत आहे. याचाच उत्तम आदर्श म्हणजे वैदाने गावातील गुरुमाऊली महिला बचत गटाच्या सौ. सुरेखा विजय पाटील.
सौ. सुरेखा पाटील यांनी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी बचत गटात प्रवेश केला आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागले. गटाच्या माध्यमातून त्यांना व्यवसायासाठी कर्जाची सुविधा मिळाली. त्यांनी प्रथम तेजश्री योजनेअंतर्गत रु.१०,००० कर्ज घेऊन शिलाई व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर ICICI बँकेतून कर्ज घेऊन वेळेत परतफेड केली आणि व्यवसाय हळूहळू वाढवत नेला. सुरुवातीला एकाच शिलाई मशीनपासून सुरू झालेला प्रवास आज तीन शिलाई मशीनपर्यंत पोहोचला आहे.
आज त्या केवळ स्वतःचा व्यवसाय वाढवत नाहीत तर तरुण मुलींना शिलाईचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाकडे मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या मुलींना विविध डिझाईन्सचे ब्लाऊज शिवण्याचे कौशल्य प्राप्त होत आहे.
सौ. सुरेखा पाटील यांचा हा प्रवास फक्त वैयक्तिक प्रगतीचा नसून सामाजिक परिवर्तनाचाही आहे. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने आणि बचत गटाच्या सहाय्याने त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे त्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
#tejaswiniyojana#mavim#nandurbar#MahilaBachatGat#MahilaShakti#successstory2025#womenempowerment2025#selfreliancejourney