
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध विषयांवर जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सभा
बैठकीत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. पोलिस तपास सुरू असलेल्या प्रकरणांचा तात्काळ निकाल लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच पीडितांना आर्थिक मदत त्वरित देण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
घर घर संविधान उपक्रम
भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या संविधान अमृत महोत्सवातर्गत “घर घर संविधान” या उपक्रमावर चर्चा झाली. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला संविधान उद्देशिकेची लाकडी फ्रेम उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तृतीयपंथी कल्याण व तक्रार समिती सभा
तृतीयपंथी समाजाच्या सबलीकरणासाठी सुरू करण्यात येणाऱ्या कॅफे उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांना सक्रियतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
#Nandurbar#DrMitaliSethi#SocialWelfare#घरघरसंविधान#संविधानअमृतमहोत्सव#SCSTAct#ThirdGenderWelfare#DistrictAdministration