जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आज जिल्हाधिकारी मा. मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत बांधकाम प्रगती, सुरक्षेची आवश्यकता, सुविधा निर्माण, तसेच शाळांसंदर्भातील तांत्रिक अडचणींचा आढावा घेण्यात आला.
या सर्व कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास सुकर होणार आहे.
उपस्थित मान्यवर:
डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार
श्रीमती अंजली शर्मा – उपविभागीय अधिकारी नंदुरबार
श्रीकृष्ण कांत कनवारिया – विभागीय अधिकारी शहादा
श्री. सतीश श्रीराव – प्राचार्य व सदस्य सचिव
श्री. चंद्रकांत पवार – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग नंदुरबार
“EMRS च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचा उज्वल मार्ग घडवण्याचा निर्धार.”