दरवर्षी पावसाळा सुरू होताच शहादा शहरातील कोर्ट परिसर व बसस्थानकात पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं. यावर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दिशेने शहादा नगरपरिषदने ठोस पावलं उचलली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देशानुसार तसेच मुख्याधिकारी श्री. साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाटचारीतील गाळ काढण्याचे महत्त्वाचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे काम खोलवर करून संपूर्ण प्रवाह मोकळा केला जात आहे, जेणेकरून पावसाचे पाणी अडथळ्याविना वाहू शकेल.
स्वच्छ नाले – सुरळीत जलप्रवाहाचे शहर!!
नियोजनबद्ध विकासाची नांदी!
तुमच्या सहकार्यानेच शहादा बनेल अधिक सुंदर, अधिक सक्षम!
हा उपक्रम अधिक प्रभावी व्हावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, आणि कुठेही कचरा/गाळ टाकू नये.

#SwachhShahada#MonsoonReady#ShahadaMunicipalCouncil#CleanCityGreenCity
















